जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात जमावबंदी आदेश लागू

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 23 ऑगस्ट 2016                                                             वृत्त क्र.548
जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात
जमावबंदी आदेश लागू
अलिबाग दि.23 :- दिनांक 24 ऑगस्ट 2016 रोजी श्रीकृष्ण जन्म, दि.25 ऑगस्ट 2016 रोजी गोपाळकाला व दिनांक 5 ते 15 सप्टेंबर 2016  या कालावधीत गणेशोत्सव आणि दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी बकरी ईद हे सण जिल्ह्यात मोठया उत्साहात साजरे केले जाणार आहेत. या सणांच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये  जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील अंमलदार व त्यावरील अधिकाऱ्यांना काही बाबींसंदर्भात संबंधितांना आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.  त्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.   रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारीतीने वागावे, चालावे त्यांची वर्तुणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे.  अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जाऊ नयेत तो मार्ग विहित करणे.  सर्व मिरवणुकीच्या जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक ठिकाणी जेथे गर्दी होणार असेल किंवा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा निर्माण होऊ नये.  सर्व रस्त्यावर रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्थानकांच्या कपडे धुण्याच्या उतरणीच्या जागांच्या ठिकाणी तसेच देवालये इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे.  कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे किंवा गाणे गाण्याचे अगर ढोल ताशे इतर वाद्य वाजविण्याचे, शिंगे इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे नियमन करणे  त्यावर नियंत्रण ठेवणे.  कोणत्याही सार्वजनिक जागेवर अगर जागेजवळ कोणत्याही सार्वजनिक मिरणुका स्थानात ध्वनीक्षेपणाचा (लाऊडस्पिकरचा) उपयोग करण्याचे नियमन करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
सदरचा आदेश लागू असे पर्यंत रायगड जिल्ह्यातील पोलीस कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा रस्त्यालगत सभा, मोर्चे, मिरवणुका, पदयात्रा मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादीवर निर्देश सक्षम अधिकारी यांचेकडून कार्यक्रमाची जागा, तारीख, वेळ,मोर्चा, घोषणामध्ये भंग घेणाऱ्याची वर्तुणूक किंवा वागणूक आगावू निश्चित केल्याशिवाय आयोजन करुन नये.  तसेच सर्व कार्यक्रम प्रसंगाला सोडून किंवा ज्यामुळे दोन किंवा अधिक जाती, गट इत्यादीमध्ये द्वेष निर्माण होईल अथवा शांतता भंग होईल अशा घोषणा देऊ नयेत अगर भाषणे करु नयेत.  अशा सर्व कार्यक्रमात अश्लील किंवा विभत्स, घोषणा, वकृत्व किंवा अंग संचलन इत्यादी प्रकार करु नयेत
सदर आदेश दिनांक 23 ऑगस्ट 2016 रोजी 00.00 म्हणजे 12 नंतर लागू असून ते 22 सप्टेंबर 2016 रोजी रात्रौ 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील. वरील आदेशाचा भंग झाल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये शिक्षेस पात्र होईल. 
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक