महाड अपघात स्थळी आपत्ती निवारण व मदत कक्ष स्थापन
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
|
फेसबुक :- dioraigad ट्विटर :- dioraigad
|
वृ.क्र.472 दिनांक
:- 04/08/2016
महाड अपघात स्थळी
आपत्ती निवारण व मदत कक्ष
स्थापन
अलिबाग
दि. 4 - महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुलाच्या अपघात स्थळी जिल्हा
प्रशासनाच्या वतीने आपत्ती निवारण कक्ष तसेच मदत केंद्राची स्थापना करण्यात आली
असून महाड उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली
सोनावणे या नियंत्रण कक्षात समन्वयक आहेत.
नातेवाईकांना
सहकार्य
या कक्षामार्फत शोध कार्यावर नियंत्रण
तसेच बेपत्ता, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देणे मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या
निवास व भोजनाची व्यवस्था पहाणे या बरोबरच सापडलेल्या मृतदेहाचे शव विच्छेदन व
संबंधीतांच्या गावापर्यंत मृतदेह पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शोध
कार्य व्यवस्थितरित्या सुरू असून आज सायं 5 वाजेपर्यंत 6 मृतदेह सापडले आहेत. त्यांची
ओळख पटली असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. मुंबई-जयगड या बसचे
वाहनचालक - श्रीकांत शामराव कांबळे, शेवंती मिरगल, संपदा संतोष वाझे, पांडूरंग
बाबू घाग, आवेद अल्प्ताफ चौगुले, प्रशांत माने.
शोध
कार्यासाठी एनडीआरएफचे पथक, नौदल, हवाई दल, स्थानिक पोलीस यांच्यासह 300 किलो वजनाचे लोहचुंबक, बोट, राफटींग, स्कूबा
डायव्हिंग, स्थानिक मच्छीमारांची मदत
घेण्यात येत आहे. या कामी नियंत्रक म्हणून अप्पर पोलीस
अधिक्षक संजय पाटील कार्यरत आहेत. शोध पथकातील जवान तसेच बेपत्ता व्यक्तींचे
नातेवाईक यांच्या भोजन निवासासाठी महाड मधील विविध सामाजिक व सेवाभावी संस्था
मार्फतही मदत होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क
कक्ष
या घटनेसंदर्भात अधिक माहिती
मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष सुरु असून अप्पर
जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत
आहेत. 02141-222118 टोल फ्री नंबर 1077 असे नियंत्रण कक्षाचे क्रमांक आहेत.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले
तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक मो.सुवेझ हक हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी संपुर्ण मदत व
शोध मोहिमेवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये
व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment