महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 01 ऑगस्ट, 2016                                                                                    वृत्त क्र.462
महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
                                          लोकाभिमुख काम करावे
                                                                                              -        जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.1 :- शासकीय यंत्रणेमध्ये महसूल विभाग महत्वाचा आहे. या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानसन्मान मिळतो. त्याच बरोबर त्यांच्यावर जबाबदारीही येते. त्यामुळे महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  त्यांचे काम अधिक लोकाभिमुख पध्दतीने करुन त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाच्या कामाला न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.
1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महसूल यंत्रणेमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपजिल्हाधिकारी सा.प्र.वि. किरण पाणबुडे, जिल्हा‍ नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, महूसल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्हा हा 15 तालुक्यांचा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्हयात काम करणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाचा ताण येणे स्वाभाविक आहे. असे असले तरी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे योग्य नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट केले तर त्यांचे काम उत्तम होईल त्याच बरोबर त्यांना आपल्या कुटुंबाला आवश्यक तो वेळ ही देता येईल. कामाची जबाबदारी पार पाडताना कौटुंबिक जबाबदारी ही योग्य पध्दतीने संभाळली पाहिजे. रायगड जिल्हा महसूल उत्पन्न मिळविण्यात कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. याचे श्रेय सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे.
 महसूल यंत्रणेतील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या माणसा बरोबर सौजन्याने बोलून त्याला हवे असलेली माहिती योग्य पध्दतीने देऊन प्रसंगी त्याला त्याच्या कामाच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन करावे. शासकीय यंत्रणेच्या केंद्र स्थानी काम करत असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाचे समाधान होईल या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले काम अधिक लोकाभिमुख करावे. सत्कार करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी या प्रसंगी अभिनंदन केले.
अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर म्हणाले की, महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली समाज मनातील प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करुया व कोकण विभागात रायगड जिल्हा सर्वच क्षेत्रात प्रथम येईल या दृष्टीने काम करण्याचा संकल्प करुया.  
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल यांनी आजचे पुरस्कार प्रातिनिधिक स्वरुपाचे असून इतर अधिकारी, कर्मचारी ही चांगले काम करत असतात. यापुढे ही क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक चांगले काम करुन जिल्हा प्रशासन पुढे नेण्याचे काम करावे असे सांगितले.
या प्रसंगी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रोहा प्रांत सुभाष भागडे, अलिबाग तहसिलदार प्रकाश सकपाळ, रोहा तहसिलदार उर्मिला पाटील आदिनी महसूल दिना निमित्त आपले विचार व्यक्त केले.
पुरस्कार मिळालेले मानकरी पुढील प्रमाणे, कोतवाल प्रभाकर तलप, शिपाई हेमंत पाटील, वाहन चालक संजय घरत, अव्वल कारकून दर्शन पाटील, लिपिक एस.एम.धोंडगे, तलाठी एम.बी.इंगरुलकर,  मंडळ अधिकारी पी.बी.मोकल.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक