सामुहिक वनहक्क दावे मंजूर करण्यासाठी जिल्हयामध्ये विशेष मोहिम - जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :-
30 जुलै 2016
वृत्त क्र.461
सामुहिक वनहक्क दावे मंजूर करण्यासाठी
जिल्हयामध्ये
विशेष मोहिम
-
जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले
अलिबाग दि.30 :- अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 अंतर्गत सामुहिक वनहक्क प्रकरणांचा निपटारा लवकर व जलद गतीने करुन आदिवासी बांधवांना तसेच इतर पारंपारिक वननिवासी यांना त्यांचे पारंपारिक हक्क प्रदान करण्यासाठी रायगड जिल्हयात विशेष मोहिम आखण्यात आली असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील ग्रामपंचायती, संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, उप वनसंरक्षक, तहसिलदार, गट विकास अधिकरी, पंचायत समिती यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिली.
रायगड जिल्हयामध्ये 1165 गावे वनालगत असून देखील सामुहिक वनहक्क दावे फार कमी मान्य झाले आहेत. तसेच दाखल झालेले वनहक्क दावे हे प्रमाण फारच कमी आहे. सामुहिक वनहक्क दाव्याचे प्रस्ताव प्राप्त करुन घेण्याकरीता विशेष मोहिमे अंतर्गत वनावरील/ वनालगतच्या गावाची यादी तयार करण्यापासून ते संबंधित जिल्हास्तरीय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी दिनांक 26 जुलै ते 17 सप्टेंबर, 2016 पर्यंतचा खालील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.
कार्यक्रम
1.) वनक्षेत्र समाविष्ट असलेल्या गावांची यादी तयार करणे व क्षेत्र निश्चित करणे :- 02 ऑगस्ट, 2016 पर्यंत, 2.) संबंधित गट / तालुका स्तरावर कार्यशाळा घेणे :- 06 ऑगस्ट, 2016 पर्यंत, 3.) दावा अर्ज भरुन घेणे :- 06 ऑगस्ट, 2016 पर्यंत, 4.) गाव पातळीवर तपासणी पूर्ण करणे :- 09 ऑगस्ट, 2016 पर्यंत, 5.) परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर करणे :- 11 ऑगस्ट, 2016, 6.) ग्रामसभेची मंजूरी घेणे :- 15, ऑगस्ट, 2016 रोजी, 7.) उपविभागस्तर समितीकडे प्राप्त झालेल्या सामुहिक दाव्यांवर निर्णय घेणे :- 06 सप्टेंबर, 2016 पर्यंत. 8.) उपविभागस्तर समितीकडून प्राप्त झालेल्या सामुहिक दाव्यांवर निर्णय घेणे :- 17 सप्टेंबर, 2016.
तरी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पांरपारिक वन निवासी यांनी याकामी संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा तहसिलदार यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा आणि आपले सामुहिक वनहक्क दावे संबंधित वनहक्क समिती/ग्रामसभेकडे दाखल करावेत असे जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आवाहन केले आहे.
000000
Comments
Post a Comment