दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न

दिनांक :- 03 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.576
दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न

            अलिबाग दि. 3:-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने आज दिवाणी न्यायालय व.स्तर अलिबाग यांच्या न्याय कक्षामध्ये  जिल्हा न्यायाधीश,रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनानुसार मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
             या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधी व.स्तर एल.डी.हुली, जिल्हा सरकारी वकील ऍ़ड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍ़ड. प्रविण ठाकूर आदी वकीलवर्ग व न्यायालयातील अधिकारी उपस्थित होते.
                यावेळी ऍ़ड. प्रसाद पाटील व ऍ़ड  श्रीराम ठोसर यांनी उपस्थित पक्षकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन ऍ़ड. पल्लवी तुळपुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍ़ड.प्रविण ठाकूर यांनी केले.

                                                       0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत