माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांच्यासाठीचे विशेष गौरव पुरस्कार

दिनांक :- 15 सप्टेंबर  2016                                                          लेख क्र. 32
माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांच्यासाठीचे
 विशेष गौरव पुरस्कार
           माजी सैनिक आपल्या सैनिक सेवेतील कार्यकाल पूर्ण केल्यानंतर विविध  क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असतात.  नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत करुन आपले बहुमोल योगदान देत असतात. देश तसेच राज्याची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम त्यांच्या हातून होते.  अशा माजी सैनिक तसेच  पत्नी,पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरासाठी विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील पुरस्काराची माहिती देणारा लेख.. 

            राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर,जळीत,दरोडा,अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश,राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक,पत्नी,पाल्य इ. यांना अशा कार्याबदृल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एक रकमी रू.10000/- व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू.25000/- चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणारआहे.
            विविध क्षेत्रात काम करणा-या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी खालील प्रमाणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे :-
खेळातील पुरस्कार
राष्ट्रीय, राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे असावा.    राष्ट्रीय, राज्य्‍ स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले असावे.  उत्कृष्टकामगिरी, पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्दी,फोटो इत्यादीबाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय,राज्यस्तरीय प्रतियोगीतेत सुवर्ण,रौप्य,कास्य यापैकी मिळविणे आवश्यक आहे किंवा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे.  खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र हे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA), स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) असोसिएशन इंडियन युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल फेडरेशन व त्यांशी संलग्न राज्यस्तरीय फेडरेशनचे असले पाहिजे.   
साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार
साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटय व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असला पाहिजे.  साहित्य, संगीत, गायन, वादन,नृत्य, नाटय व इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी, पुरस्कार मिळविल्या बाबत वर्तमान साहित्य, संगीत, गायन, वादन,नृत्य, नाटय व इतर कला क्षेत्रात वृत्तपत्रात प्रसिध्दी,फोटो असावेत.   साहित्य, संगीत, गायन, वादन,नृत्य, नाटय व इतर कला क्षेत्रात शासनमान्य किंवा नामवंत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून सन्मानीत केलेले असले पाहिजे. 
नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणा-यांना पुरस्कार
 पूर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती (भुकंप/वादळ) मध्ये बहुमोल कागमिरी केली असली पाहिजे.  अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र,राज्य शासन तसेच अन्य सामाजिक संस्थांद्वारे पुरस्कार, प्रशस्तीपत्र मिळाले असल्यास वर्तमानपत्रात प्रसिध्दी,फोटो असावे तसेच त्या बाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडणे आवश्यक आहे.   अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र/राज्य्‍ शासन तसेच अन्य्‍ नामवंत संस्थांद्वारे पुरस्कृत असले पाहिजे. 
शैक्षणीक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नाशिक व लातूर) इयत्ता 10वी व 12 वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त्‍ गुण मिळवून उत्तीर्ण होणा-या प्रत्येक मंडळातील पहिल्या 5 (5X10 मंडळे = 50 असे इ. 10वी चे एकूण 50 पाल्य व इ. 12 वीचे एकूण 50 पाल्य) माजी सैनिक,विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रू.10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.    पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य्‍ यांना एकरकमी रू.10 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार
यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणा-यांना राष्ट्रीय,राज्य स्तरावर वृत्त्पत्र, मासिक व राज्यस्तरावरचे व्यावसायिक स्तरावरचे संघटन यांनी पुरस्कृत केले असले पाहिजे.    कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन काढणा-या  शेतक-यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र प्राप्त असले पाहिजे किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेकडून प्रशस्तीपत्र प्राप्त असले पाहिजे.   
सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार
 सामाजिक काम जे की राज्य स्तरावर प्रशंसा किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य केले असले पाहिजे.   पर्यावरणामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणल्यामुळे त्या भागातील किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य केले असले पाहिजे.  सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषक कार्य करणा-या नामवंत संस्था,वृत्तपत्र यांचेकडून गौरव, प्रशस्तीपत्र मिळाले असले पाहिजे.
वरील सर्व पुरस्कासाठी नमूद केलेल्या संस्थांच्याव्यतीरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.
            सदरचा गौरव पुरस्कार मिळणेसाठी पात्रताधारकांनी खालीलपैकी लागू असलेली कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. वैयक्तीक अर्ज (कंपलसरी). फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध आहे-कंपलसरी). ओळखपत्राची पाठपोट छायांकीत प्रत (कंपलसरी).   उत्कृष्ट कामगिरीबाबतच्या प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत.  वर्तमानपत्रातील जाहिरातीचे कात्रण.   10वी, 12वीच्या प्रमाणपत्राची,गुणपत्रीकेची साक्षांकीत प्रत, डिस्चार्ज बुकात कुटूंबाची नावे असलेल्या पानाची छायांकीत प्रत.   राष्ट्रीयकृत बँक पासबुकाची छायांकीत प्रत जोडावी.
            तरी जास्तीत जास्त माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी 20 सप्टेबर 2016 पर्यंत अर्ज करावेत.  अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000

संकलन
जिल्हा माहिती कार्यालय

 रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत