अधिकाऱ्यांनी शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात -पालकमंत्री प्रकाश महेता
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 30/09/2016 वृ.क्र. 632
अधिकाऱ्यांनी
शासकीय योजना
अधिकाधिक
लोकांपर्यंत पोहोचवाव्यात
अलिबाग दि.30 (जिमाका) अधिकाऱ्यांनी
विविध शासकीय लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन त्या योजना अधिकाधिक
लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगड
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश
महेता यांनी आज पेण येथे दिले.
पेण येथील वॉस्ट पॅलेस येथे आयोजित
तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत
ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद
सदस्य संजय जाभळे, सभापती मालती कदम, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ.अविनाश गोटे, पेणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती पी.एस.जैतू, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी के.बी.तरकसे तहसिलदार श्रीमती श्रीमती वंदना मकू, गटविकास
अधिकारी श्री.राजपूत, आदि उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना
मंत्री महोदय म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीची
व पडझड झालेल्या घरांचे त्वरित पंचनामे करुन अहवाल सादर करावा. जेणेकरुन त्यांना
त्वरित शासनाकडून मदत दिली जाईल. नॅशनल
हायवे,जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम
विभाग अंतर्गत नादुरुस्त रस्त्यांची कामे त्वरित करावी अशा सूचना संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अधिकाधिक प्रमाणात राबवावी असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
औद्योगिक कंपन्याच्या होणाऱ्या
प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व मस्त्यव्यवसायावर परिणाम
होणार नाही यादृष्टीने संबंधितांनी काळजी घ्यावी. खार बंदिस्ती व जलसंपदा विभागांबाबत बोलताना
ते म्हणाले संबधित अधिकारी, प्रातं. व तहसिलदार यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन
झालेल्या कामांची पाहणी करावी. मच्छिमार
पुनर्वसन, नुकसान भरपाई, पेयजल योजना, खार बंदिस्ती याबाबतही आढावा घेतला. तसेच पेण शहरातील शुध्द पाणी व
आरक्षित भूखंड याबाबतही सविस्तर चर्चा करुन आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती
शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनीही
सर्व कामांबद्दल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस जि.प., पं.स.सदस्य,
नगर सेवक, विविध विभागांचे अधिकारी, जे.एस.डब्ल्यू,रिलायन्स या कंपनीचे अधिकारी
उपस्थित होते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
000000
Comments
Post a Comment