पत्र सूचना कार्यालयाची पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा

दिनांक :- 21 सप्टेंबर  2016                                                                                                  वृत्त क्र. 618
पत्र सूचना कार्यालयाची
पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा

   अलिबाग दि.21 :-  (जिमाका) भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालय मुंबई आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 सप्टेंबर, 2016 रोजी माध्यम प्रतिनिधींसाठी एक दिवशीय ग्रामीण माध्यम  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  
केंद्र सरकारच्या निती आणि विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचविणे, माध्यमासंबंधी विषयावर चर्चा तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढविणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.    हॉटेल मेपल आय.व्ही., गोंधळपाडा, अलिबाग येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.  तर दैनिक प्रहारचे संपादक मधुकर भावे हे  मार्गदर्शन करणार आहेत.       
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी आपली नावे, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल इत्यादी जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथे किंवा dioraigad@gmail.com या ई-मेलवर  दिनांक 22 सप्टेंबर, 2016 पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत पाठवावीत.    या कार्यशाळेत स्थानिक जिल्हा,तालुका, गावपातळीवरील पत्रकारांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.. 
000000



Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत