रायगड जलक्रांती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 29/09/2016 वृ.क्र.६30
रायगड जलक्रांती पुस्तिकेचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अलिबाग दि. 29 – रायगड जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रायगड
जलक्रांती एक प्रयत्न या चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते आज ठाणे येथे संपन्न झाले.
कोंकण विभागीय आढावा बैठकीच्या निमीत्ताने ठाणे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये आयोजित या प्रकाशनाच्यावेळी रायगडचे
पालकमंत्री प्रकाश महेता, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिधुदूर्गचे
पालकमंत्री दिपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच राज्यमंत्री
रविंद्र चव्हाण, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
प्रविणसिंह परदेशी तसेच प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजेशकुमार मीना, बिपीनकुमार
श्रीमाळी, मिलींद म्हैसकर, राजगोपाल देवरा, सुरेंद्र बागडे, डॉ. असिम गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम
भापकर, आदी प्रधान सचिव तसेच सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी
उपस्थित होते.
या पुस्तिकेत रायगड जिल्हयात झालेल्या जलयुक्त
शिवार अभियान तसेच दोन कोटी वृक्षलागवड आणि लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे या
महत्त्वपूर्ण अशा तीन योजनांची सचित्र माहिती संकलीत करण्यात आली असल्याचे रायगड जिल्हाधिकारी श्रीमती शीतल
तेली-उगले यांनी प्रकाशन प्रसंगी मुख्यमंत्री तथा इतर मान्यवरांना सांगितले.
सचित्र पुस्तिका
जलक्रांती एक प्रयत्न या सचित्र पुस्तिकेत
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत रायगड जिल्हयातील तालुक्यांत करण्यात आलेल्या
कार्याचा सचित्र वृत्तांत त्याच प्रमाणे जलयुक्त शिवार अभियानाने साचलेल्या जलाशयाचे
सुरेख छायाचित्रे, लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे मोहिमेला मिळालेले यश याखेरीज
दोन कोटी वृक्षलागवड अंतर्गत असलेला लोकप्रतिनिधींसह नागरीकांचा सहभाग आदिंचेही
छायाचित्रे या पुस्तिकेत आहेत
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी
कार्यालय, रायगड मार्फत तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेची निर्मिती अपर
जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे
त्याचप्रमाणे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपजिल्हाधिकारी श्रीमती
वर्षा लड्डा-उंटवाल यांनी केले असून पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.
राजू पाटोदकर यांनी केले आहे. अग्रावकर
ग्राफिक, रायगड यांनी पुस्तिकेची सजावट केली आहे.
********
Comments
Post a Comment