स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते.

दिनांक :- 2 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 638
स्वच्छ भारत अभियानात
सर्व घटकांचा सहभाग आवश्यक
                                                        केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते.
                                                        



       अलिबाग दि. 2:-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी   2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने  रायगड जिल्हयातही दोन वर्षापासून  स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांनी सहभाग घेऊन हे अभियान सुरु ठेवावे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज येथे केले.
   गांधी जयंती निमित्त  अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्याच्या विशेष स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी   जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली उगले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनावणे, तहसिलदार प्रकाश संकपाल,   जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
                 पुढे बोलतांना मंत्रीमहोदय म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करुन देशात एक चळवळ उभी केली व  स्वच्छ भारताचा नारा  दिला .स्वच्छतेची आवड व सवय निर्माण व्हावी यासाठी हे अभियान होत आहे. एकदा का ही सवय व आवड निर्माण झाली तर त्या अनुषंगाने    आपले घर, परिसर, शहर, राज्य आणि राष्ट्र स्वच्छ होईल पर्यायाने  हे अभियान यशस्वी ठरेल असेही ते म्हणाले. तसेच  हे अभियान कोणत्याही एखादया पक्षाचे नसून समाजातील सर्व घटकांचे आहे.जनतेचे आहे. जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी गावे स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करुन पर्यटकांना त्याचे आकर्षण राहिल असे पहावे.   ही मोहीम केवळ अभियानापूरती न ठेवता नियमित पुढे सुरु ठेवावी. असे मंत्रीमहोदयांनी सांगितले.  
                या मोहितेम सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, दिपक रानवडे, रुपेश जामकर, संजय देशमुख, प्रिझम सामाजिक संस्था, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस विभाग, आरोग्य विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालय येथील कर्मचारी तसेच नागरिक व पर्यटकही सहभागी झाले होते.   

                                                                        00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत