जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव शालेय विद्यार्थ्यांशी संवाद
दिनांक :- 20ऑक्टोबर 2016
वृत्त क्र. 677
जिल्हाधिकाऱ्यांचा खानाव
शालेय विद्यार्थ्यांशी संवाद
अलिबाग दि. 20: (जिमाका) एक दिवस शाळेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी केंद्र प्रमुख श्रीमती निता
धुमाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना म्हात्रे, शिक्षक विकास म्हात्रे, निलेश वारगे, श्रीमती रुपाली भगत, श्रीमती उमा कोल्हे, राजेंद्र भोईर, श्रीमती सरोज पाटील, श्रीमती सारिका पेडणेकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी बरोबर संवाद साधून शिक्षणापासून होणारे फायदे, स्वच्छता, आरोग्य याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनीं सोबत परिपाठ घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,
प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, दिनविशेष, समुहगीत, गोष्ट, पसायदान म्हटले
त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी
या सर्व बाबींमध्ये काही सुधारणा कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असताना प्रत्येक वर्गात जाऊन
प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शाळेत
असलेल्या ई-लर्निंग रुमला भेट दिली.
000000
Comments
Post a Comment