आयुष व महिला मंडळातर्फे मधुमेह जनजागृती अभियान संपन्न

दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 772

आयुष व महिला मंडळातर्फे
मधुमेह जनजागृती अभियान संपन्न


अलिबाग,दि.1(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेमार्फत कुळस्वामी महिला मंडळ,पोयनाड आयुष विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह जनजागृती अभियान संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती श्रीमती चित्रा पाटील या उपस्थित होत्या.
            या कार्यक्रमांत मार्गदर्शन करतांना सौ.चित्राताई पाटील यांनी सांगितले की,संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या महिला स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे बदलत्या राहणीमानामुळे व ताणतणावांमुळे मधुमेह,रक्तदाब आदी चुकीच्या जीवनशैलीमुळे उदभवणारे आजार आजकाल दिसून येतात. त्यामुळे सर्वांनी स्वत: बरोबरच कुटूंबातील जेष्ठांची काळजी घ्यावी व नियमितपणे चालणे, योग्य आहार, व्यायाम आदी सकारात्म्क सवयी अंगी बाळगाव्यात असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात आहारातून आरोग्याकडे या विषयी मार्गदर्शन डॉ. भक्ती पाटील, वैद्यकीय समन्वय अधिकारी राजीव गांधी  जीवनदायी आरोग्य योजना जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी दिली.    तसेच डॉ.चेतना पाटील यांनी आयुष विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  डॉ.रश्मी गंभीर यांनी मधुमेह हा आजार व त्यास प्रतिबंध वं उपचार याबाबत मार्गदर्शन केले.
            पोयनाड परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या शिबीराचा लाभ घेतला.  पोयनाड येथील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ.ओमकार पाटील,डॉ.राकेश बाफना व प्राथमिक आरोग्य केंद्रातील पोयनाड येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ,नर्सिंग स्टाफ,विजय हातागडे,रुपेश पाटील,आयुष कक्ष यांनी सदर शिबीरास मदत केली. सुत्रसंचालन श्रीमती सुजाता चवरकर यांनी केले.

000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज