पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर

पंचायत समिती सभापती
पदांचे आरक्षण जाहिर



             अलिबाग दि.08 (जिमाका ) :-  रायगड जिल्हयातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यात करण्यात आली.  आज  दि. 8 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथे जिल्हाधिकारी श्रीमती तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  सभेत आरक्षण सोडतीद्वारे जाहिर करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (सामान्य) अजित नैराळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आरक्षण
        पंचायसमितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.  सर्वसाधारण- तळा, माणगाव, कर्जत, महाड.  सर्वसाधारण महिला- मुरुड, म्हसळा, खालापूर, श्रीवर्धन.  नागरिकांचा मागास प्रवर्ग-उरण, सुधागड-पाली.  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-पनवेल, रोहा. अनुसूचित जाती महिला-पोलादपूर.  अनुसूचित जमाती- अलिबाग.  अनुसूचित जमाती महिला- पेण.
पंचायत समितीच्या सभापती पदाचे हे आरक्षण सदर सभापती पदाच्या विद्यमान आरक्षणाची मुदत संपल्याच्या दिवसानंतर येणाऱ्या लगतच्या दिवसापासून सुरु  होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता जाहिर करण्यात आले आहे.
            समीर पुंडलिक मुदगल या मुलाच्या हस्ते चिठ्ठीद्वारे हे आरक्षण काढण्यात आले.  यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज