रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह

दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 78
रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक
मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह  
             अलिबाग दि.10 (जिमाका ) :-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता रायगड जिल्ह्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह  यांची नियुक्ती करण्यात आली असून  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
संभाव्य दौरा कार्यक्रम
            मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक  कालावधीतील संभाव्य दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  रविवार  दि.12 फेब्रुवारी 2017 रोजी माणगाव, तळा, रोहा.   सोमवार 13 फेब्रुवारी महाड, पोलादपूर. मंगळवार 14 फेब्रुवारी-श्रीवर्धन, म्हसळा.  रविवार 19 फेब्रुवारी-अलिबाग, मुरुड.   सोमवार 20 फेब्रुवारी-खालापूर, पेण, सुधागड-पाली.  मंगळवार 21 फेब्रुवारी-अलिबाग, मुरुड (राखीव). बुधवार 22 फेब्रुवारी-उरण, कर्जत, पनवेल. गुरुवार 23 फेब्रुवारी-अलिबाग, मुरुड (राखीव).
            मुख्य निवडणूक निरीक्षक श्री.सिंह यांचा निवडणूक कालावधीतील संपर्कासाठी पत्ता - तुषार विश्रामगृह, पहिला मजला, अलिबाग, जि.रायगड. दूरध्वनी क्रमांक 02141-224363, ई-मेल आयडी-chiefobserverraigadzp17@gmail.com असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी, प्रसाद खैरनार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  हे असून  त्यांचा  मोबाईल क्रमांक 8308102338 हा आहे. 
           

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत