मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य तथा विविध उपक्रम

दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 79
मतदान जनजागृतीसाठी
 पथनाट्य तथा विविध उपक्रम

अलिबाग दि.10 (जिमाका ) :- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्वात्रिक निवडणूक-2017 चे मतदान 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे.  मतदानाची टक्केवारी वाढावी  यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत  आहेत.
 या अंतर्गत प्रिझम संस्था अलिबाग यांनी पेण तालुक्यातील खारेपाट भागातील वढाव, मोठे भाल, विठ्ठलवाडी, कान्होबा, नारवेल, बेनवले, शिर्की, बोर्वे, शिर्कीचाळ, मसद बेडी, सागरवाडी आदिगावांमध्ये पथनाट्य कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी वाशीचे मंडळ अधिकारी श्री.पाटील, तलाठी बोर्झे श्री.वाभळे, तलाठी शिर्की श्री.हाले हे उपस्थित होते.  सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले. 
जिल्हा प्रशासन व  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग मार्फत मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्यातील जाहिरात फलकांवर मतदान करण्याबाबतचा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. तसेच एस.टी.बस स्थानकांवर ऑडिओ जिंगल्सद्वारे  जनजागृती करण्यात येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज