माणगांव तहसिल कार्यालयातर्फे चावडी वाचन कार्यक्रम संपन्न

माणगांव तहसिल कार्यालयातर्फे
चावडी वाचन कार्यक्रम संपन्न

            अलिबाग दि. 20 (जिमाका)   राष्ट्रीय भुमी अभिलेख अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गत माणगांव तालुक्यांतील 186 गावांपैकी 39 गावांमध्ये चावडी  वाचन कार्यक्रम राबविण्यात आला. खातेदारांना मंडळ अधकारी, तलाठी यांच्या हस्ते 7/12 वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकामी तहसिल कार्यालय माणगांव येथे  वेळोवेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांची सभा घेण्याबाबत माणगांवच्या  तहसिलदार श्रीमती उर्मिला पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. चावडी वाचन कार्यक्रम यशस्वी राबविण्याकरिता सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे.
            तसेच महाराजस्व  अभियानांतर्गत दिनांक 9 जून 2017 रोजी माणगांव येथे विविध 692 दाखले वाटप करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांना अद्यायावत गाव न.नं.व 7/12 ची प्रिंट संबंधित तलाठी यांचेकडून प्राप्त करुन अचूक असल्याची खात्री करावे असे आवाहनही करण्यात आले. सर्व महा-ई सेवा, सेतू केंद्रांना सर्व प्रकारचे दाखले त्वरित देण्यात यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

                                                         00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत