कार्यक्षमता व पारदर्शकतेसाठी वाहतुक पोलिसांचे आता ई- चलन
अलिबाग, दि.17 (जिमाका) - वाहतूक विभागात अधिक पारदर्शकता व कार्यक्षमता दिसून येण्याकरीता रायगड जिल्ह्यात ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. याप्रणालीचा अधिक वापर करुन पोलिस विभाग स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले.
मुंबई,पुणे, नाशिक येथे ई- चलनाद्वारे तडजोड स्वीकारण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. शासनाच्या कॅशलेस व पेपरलेस धोरणानुसार रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने ई-चलनाद्वारे तडजोड स्वीकारण्याच्या कार्यवाही चा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अतिरीक्त पोलस अधिक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपाधिक्षक गृहविभाग राजेंद्र दंडाळे, डी.बी. निघोट, नगर सेविका सुरक्षा शहा पोलिस निरीक्षक सुरेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागात ही सेवा सुरु करण्याचा मान रायगडने सर्वप्रथम पटकाविल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकरयांनी सांगितले. या सेवेमुळे कामात पारदर्शकता येण्या बरोबरच कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होईल असा विश्वास पारस्कर यांनी यावेळी व्यक्त केला
यावेळी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी, जेष्ठ नागरिक, रिक्षाचालक, नागरिक उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment