स्वयं प्रकल्पः कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अलिबाग दि.19,(जिमाका):- आदिवासी विभाग, महिला
बालकल्याण पशुसंवर्धन व ग्रामविकास विभाग हे संयुक्तपणे जिल्ह्यात सन 2017-18 ते
2019-20 या तीन वर्षात ग्रामीण परसातील कुक्कुट पालन आदिवासी उपयोजना क्षेत्र यांचेमार्फत
राबविणार आहेत. या स्वयं प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यामध्ये 2 ठिकाणी मदर युनिट स्थापन
करण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड व मदर युनिट धारक
निवड होणार आहे. त्यासाठी गठित जिल्हा समन्वय समिती चे सदस्य सचिव, जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त रायगड हे आहेत. हा प्रकल्प राबविण्याच्या
कार्यपद्धतीसाठी प्रकल्पाचे सनियंत्रण जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण यांचेकडे सोपविण्यात आले आहे.
या योजनेचा
मुख्य उद्देश आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या आहारात अंड्याचा पुरवठा करुन कुपोषण दूर
करणे व स्वयंरोजगार निर्मिती करणे हा आहे.
या स्वयंम प्रकल्प योजनेत शासनाने
सन 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षामध्ये प्रत्येकी रु.साठ हजार पक्षी संगोपन करण्यासाठी
अनुदान देण्यात येणार आहे. दोन मदर युनिटद्वारे
834 कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे. या पक्षांचे वाटप तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत. वीस, पंधरा
व दहा असे एकूण पंचेचाळीस पक्षी अनुक्रमे 55 रुपये, 98 रुपये व 60 रुपये दराने मदर
युनिट धारकाकडून खरेदी करुन प्रत्येक लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती व प्रशिक्षण,
क्षमता बांधणी पशुसंवर्धन खात्याकडील सधन कुक्कुट
प्रकल्प, पेण यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ
व्हावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,
अलिबाग जिल्हा रायगड. यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment