राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव; आणि पारितोषिक वितरण समारंभ यंदा अलिबाग येथे; आज पासून महोत्सवास प्रारंभ; 21 रोजी पारितोषिक वितरण


अलिबाग दि.18(जिमाका), सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत  56 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.  तर 21 तारखेला राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार प्रदान होणार आहे.
या महोत्सवात पी.एन.पी. नाट्यगृह  येथे दि.19 ऑगस्ट 2017 रोजी सायंक 7 वाजता हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक एम.एच.12 जे 16 हे प्रयोग,पुणे ही संस्था सादर करणार आहे. दि.20 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 12.30 वाजता संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते बिंदू संदेश: हे नाटक संक्रमण, पुणे ही संस्था सादर करणार आहे. याच दिवशी दुपारी 2 वाजता बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक हॅलो ब्रदर हे बालनाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगांव दाभाडे शाखा ही संस्था सादर करणार असून याच दिवशी सायं. 7 वाजता हिंदी नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते ये कौन चित्रकार है हे नाटक अविष्कार, मुंबई ही संस्था सादर करणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि.21 रोजी दुपारी तीन वाजात पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे होणार असून या सोहळ्यास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गीते, राज्याचे सांस्कृतिक कार्य, शालेय शिक्षण, क्रीडा युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ विभागाचे मंत्री ना. विनोद तावडे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता, यांची प्रमुख उपस्थिती राहिल. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कु.आदीती तटकरे, विधान परिषद सदस्य जयंत पाटील, आ.सुभाष उर्फ पंडीतशेठ पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे.
या नाट्य महोत्सवातील नाटके व पारितोषिक वितरण समारंभ विनामूल्य असून सर्वांसाठी खुले आहेत. या कार्यालयास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधानसचिव नितीन गद्रे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांनी केले आहे.
मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना नाट्यक्षेत्रातील जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिके वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी  विनामूल्य आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक