माथेरान संनियंत्रण समितीची बैठक 23 रोजी
अलिबाग
दि.18,(जिमाका) :- पर्यावरणदृष्ट्या
संवेदनशिल क्षेत्रातील विकास कामांच्या मान्यतेसाठी घ्यावयाच्या माथेरान संनियंत्रण
समितीची बैठक बुधवार दि.23 रोजी सकाळी माथेरान ता. कर्जत येथे आयोजित करण्यात आली
आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील
अधिसूचनेनुसार रायगड व ठाणे जिल्ह्यातील 89 गावांचा भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित
करण्यात आला आहे. या गावांमध्ये करावयाची
विकासकामे करतांना संनियंत्रण समितीच्या पुर्व मान्यतेखेरीज करता येत नाहीत.
त्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी
वासूदेव गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड हे
आहेत. या समितीची तिसरी बैठक बुधवार दि.23 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र पर्यटन
विकास महामंडळ विश्रामगृह, दस्तूरी, माथेरान ता. कर्जत येथे आयोजित करण्यात आली
आहे.
या बैठकीत विकास कामांविषयक,
बांधकामे व बांधकामांचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, भुगर्भातील
पाण्याची विक्री या सारख्या विषयांना समितीची
पूर्वमान्यता आवश्यक आहे. तसेच या समितीकडे कोणासही तक्रारी अर्ज द्यावयाचे असतील त्यांनी आपले तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी रायगड
यांचेकडे सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले
आहे.
Comments
Post a Comment