स्त्री समस्या जनजागृतीपर देखावे उभारण्याचे गणेश मंडळांना आवाहन
सर्वोत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांना पारितोषिके
अलिबाग
दि.19,(जिमाका):- स्त्री
भृणहत्या,हुंडाबळी,कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, बाल लैंगिक
शोषणापासून संरक्षण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा,मुलगा व मुलीस घरामध्ये समान वागणूक या
सारख्या स्त्री समस्याप्रधान विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील
गणेशोत्सव मंडळांनी जनजागृतीपर देखावे, नाटिका आदी सादर करावे, असे आवाहन जिल्हा
महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या विषयांवर जनजागृतीपर
देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्रथक क्रमांक दोन हजार, द्वितीय क्रमांक एक हजार व
पाचशे रुपये तसेच प्रशस्तीपत्र तसेच स्मृतीचिन्ह या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात
येईल. इच्छुक मंडळांनी आपल्या मंडळाचे नाव
सविस्तर पत्ता,सादर करण्यात येणाऱ्या नाटीका कार्यक्रम,पोस्टरचा विषय याबाबत ‘जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय’
श्रीबाग नं.2,डॉ.वाजे हॉस्पीटल जवळ, ता.अलिबाग,जि. रायगड येथे गुरुवार, दि.24 ऑगस्ट
पर्यंत माहिती नोंदवावीत. पुरस्कारासाठी समिती नोंदविलेल्या मंडळाचे परिक्षण करुन
तीन गणेश उत्सव मंडळांची निवड करेल. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी
होऊन स्त्रियांविषयक कायद्यांच्या जाणीव-जागृती मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment