महाड येथे ऊर्दू लोकराज्य मेळावा संपन्न कांबळेतर्फे महाड गांव होणार राज्यातील पहिले ऊर्दू लोकराज्य ग्राम
अलिबाग,दि.1(जिमाका):-
महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड हे गांव राज्यातील पहिले उर्दू लोकराज्य ग्राम
होणार, असे आज महाड येथे आयोजित ऊर्दू लोकराज्य मेळावा आयोजन करण्यात आला या मेळाव्यास
कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे, जिल्हा माहिती अधिकारी,रायगड मिलिंद दुसाने,
सामाजिक कार्यकर्ते महंमद शफी पुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दुसाने यांनी
केले. यावेळी बोलतांना डॉ.मुळे म्हणाले की, समाजातील त्या भाषेत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
त्यासाठी ऊर्दू भाषिकांनी ऊर्दू लोकराज्यचे वाचक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. पुरकर
यांनी कांबळे तर्फे महाड हे गांव लोकराज्य ग्राम होईल, असे घोषित केले.
या कार्यक्रमास महाड
येथील ऊर्दू भाषिक महिला, पुरुष, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता
झाली.
000000000
Comments
Post a Comment