संवादपर्व हा उपक्रम जनसामान्यांच्या हिताचा- तहसिलदार अजय पाटणे
अलिबाग दि.29, (जिमाका), माहिती व
जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी
राबविण्यात येत असलेला संवादपर्व हा उपक्रम जनहिताचा आहे, असे प्रतिपादन पेण येथील
तहसिलदार अजय पाटणे यांनी आज पेण येथे बोलताना केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
वतीने आयोजित संवादपर्व या उपक्रमाचे आयोजन आज पेण येथील पेण नगरपरिषद कर्मचारी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे करण्यात
आले होते. या कार्यक्रमात पेणचे तहसिलदार अजय पाटणे, पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
जीवन पाटील, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, तसेच मंडळाचे अध्यक्ष
प्रविण कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.पाटणे म्हणाले
की, शासन जनतेच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. तसेच सार्वजनिक
हितासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकास कामे ही करीत असते. शासन
तळागाळातील व्यक्तींच्या विकासासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवित
असलेल्या विविध योजना संवादपर्व सारख्या उपक्रमातून त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात
येतात. त्यामुळे हा उपक्रम जनसामान्यांच्या हिताचा आहे, असे सांगून त्यांनी
उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ घेण्याचे
आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी
जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले तर मंडळाचे अध्यक्ष प्रविण कदम
यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संतोष पाटील, श्री. म्हात्रे, मंडळाचे
पदाधिकारी हिरामण पाटील, मनिष गायकवाड, रामचंद्र गोखले, प्रशांत ढवळी, दयानंद
गांवडे, शिवाजी चव्हाण, भरत निंबरे, उमंग कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा
माहिती कार्यालयातील हिरामण भोईर, विठ्ठल बेंदुगडे, जयंत ठाकूर, सचिन राऊत यांनी
परिश्रम घेतले.
000000
Comments
Post a Comment