महा अवयवदान दिवस: अवयवदानाचा संकल्प करा- डॉ. अजित गवळी
अलिबाग दि.29- आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध
गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. मरणोत्तर आपल्या अवयवदानाने कुणाचे तरी प्राण वाचणार आहेत ही भावना जनतेमध्ये
रुजून अवयवदानाला चालना मिळावी याकरीता महा अवयवदान महोत्सव राबविण्यात येत आहे.
या महोत्सवात अवयवदानाचा संकल्प 'संकल्प पत्र' भरुन प्रत्येकाने करावा, असे आवाहन
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज केले.
महा
अवयवदान महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा
रुग्णालय रायगड-अलिबाग येथे आज सर्व
कर्मचाऱ्यांनी व उपस्थित नागरिकांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, निवासी वैद्यकीय
अधिकारी (बाह्य) डॉ.सुहास कोरे, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुचिता
गवळी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती जयश्री मोरे, जिल्हा कार्यक्रम
व्यवस्थापक संजय माने, समन्वयक सुनिल चव्हाण, अर्थ संकल्पीय व वित्त अधिकारी
प्रथमेश मोकल, नेत्रदान समुपदेशक श्रीमती स्नेहल सपकाळे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत
अवयवदानाची शपथ घेतली. त्यानंतर
उपस्थितांना अवयवदानाचा महत्त्व सांगून त्यांना संकल्प पत्र वितरीत केले. जास्तीत
जास्त व्यक्तींनी आपल्या अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी
उपस्थित सर्व स्टाफ नर्स, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच एनएचएम, डापकु, एआरटी
इत्यादी रुग्णालयाच्या विविध विभागातील कर्मचारी यांना अवयवदानाचे संकल्प पत्र
(फॉर्म) वाटप करण्यात आले. हे संकल्प पत्र लवकरात लवकर भरुन जमा करावे, असे आवाहन डॉ.अजित गवळी यांनी केले.
Comments
Post a Comment