एचआयव्ही प्रतिबंधासाठी संयमित जीवन आवश्यक - डॉ.अजित गवळी


अलिबाग,दि.16,(जिमाका):- एच.आय.व्ही एडस या आजाराच्या प्रतिबंधासाठी, संयमित जीवनचर्या  आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज येथे केले.
खानाव ता. अलिबाग येथे एच.पी.गॅस कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एच.आय.वही एडस बाबत जनजागृती करण्यासाठी जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी  वरिष्ठ व्यवस्थापक कृष्ण नारायण तरबेज, मुकूंद जवंजाळ, विराज नारायण किर, नवनाथ लबडे, डॉ. दीपक गोसावी, समुपदेशक अर्चना जाधव, सुजाता तुळपळे आदी उपस्थित होते. यावेळी  गरोदर मातांना असलेला संसर्ग व त्यावरील उपचार पद्धती,  मोफत तपासणी व समुदेशन सुविधा आदींबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
जनजागृती रॅली
जिल्हा एडस्‍ प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालय व रुरल अँड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त् विद्यमाने एचआयव्ही,एडस् विषयी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे (12 ऑगस्ट )औचित्य् साधून स्वातंत्र्य दिनी(15ऑगस्ट्) रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना शपथ दिली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ.मकरंद पाटील,डॉ.सुहास कोरे,डॉ.अनिल फुटाणे, डॉ.सुरेश देवकर,संजय माने,नवनाथ लबडे,प्रतिक पाटील,रविंद्र कदम, सुशिल साईकर, प्रतिक सुतार, रुपेश पाटील, श्री.सोनार, श्री.घाटगे तसेच अन्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा एडस् प्रतिबंधव नियंत्रण विभाग, संजय माने, रायगड यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.  जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीची सुरुवात करुन एस.टी.स्टँड सर्कल येथून पुन्हा शिवाजी पुतळया जवळून बाला नाका ते नर्सिंग स्कुल जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कुल जिल्हा सामान्य् रुग्णालय, अलिबाग येथील प्राध्यापक वर्ग व नर्सिंग विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी,कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला.

००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक