प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना नोंदणीकृत सुक्ष्म सिंचन संच विक्रेते, वितरकांना आवाहन


अलिबाग,दि.4(जिमाका)- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  त्यासाठी सुक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपन्यापैकी सर्वदृष्ट्या वैध असलेल्या  उत्पादकांना सन 2016-17 मध्ये तीन वर्षासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच दि. 13 जुलै 2017 रोजी वैध बी.आय.एस. धारण करणाऱ्या सुक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपन्यांची यादी संचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय पुणे, यांचेकडून महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागांच्या संकेतस्थळावरील ई-ठिबक या आज्ञावलीवर डाऊनलोड या शिर्षाखाली प्रसिद्ध झाली आहे.  या यादीतील उत्पादक कंपन्यांनी प्राधिकृत केलेल्या विक्रेते,वितरकांनी  आपली नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड, राऊत वाडी,वेश्वी ता.अलिबाग जि.रायगड येथे करावी.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड यांनी केले आहे. संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02141-222094 असा आहे. 

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज