राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त कुरुळ येथे रक्त तपासणी शिबीर

अलिबाग दि.19, (जिमाका)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग व जिल्हा परिषद शाळा, कुरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग यांच्या सहकार्याने कुरुळ येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन व एच. आय. व्ही. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, संकेत घरत,  एच. आय. व्ही. विभागाचे रुपेश पाटील, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार,  रा.जी.प. शाळा कुरुळचे मुख्याध्यापक विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर आदी मान्यवर उपस्थित  होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्रतिम सुतार यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.  तसेच जंतांचा प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलिनता, तीव्र संसर्गाची लक्षणे आदींबाबत माहिती देण्यात आली.  यावेळी शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व ग्रामस्थांची रक्तगट, हिमोग्लोबिन व  एच. आय. व्ही. तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम  यशस्वी करण्याकरिता नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रतीक पाटील, जुईली पाटील, नम्रता पाटील आणि शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत