इन्स्पायर ॲवार्डसाठी मागविली ऑनलाईन नामांकने


अलिबाग, दि.5 (जिमाका)- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी Inspire Award MANAK या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची online  नामांकने सादर करण्याची प्रक्रीया सुरु असून त्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत आहे.
इ.6 वी ते इ.10 वी चे वर्ग असलेल्या सर्व प्रकारच्या सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांना विद्यार्थ्यांचे नामांकन Online सादर करता येतील. ज्या शाळांनी एकदाही सहभाग घेतला नसेल अशा शाळांनी प्रथम एकाचवेळा नोंदणी (One Time Registration) करण्यासाठी वेबसाईट www.insprireawards-केज .gov.in या संकेतस्थळावर Online नामांकने सादर करावी. विद्यार्थ्यांची नामांकने सादर करतांना प्रकल्पाची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक )रायगड जिल्हा परिषद,अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज