स्वस्तधान्य दुकानदारांच्या मार्जिन दरात वाढ


अलिबाग,दि.16,(जिमाका):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वितरणासाठी शिधावाटप,रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये देण्यात येत असलेल्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
रास्त भाव दुकानदारांना ए.पी.एल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य् गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू,तांदूळ,साखर व भरड धान्याच्या वितरणासाठी सध्या मिळत असलेल्या रु.70/-प्रती क्विंटल या मार्जिनमध्ये रु.80/- इतकी वाढ करुन त्यांना रु.150/- प्रती क्विंटल या प्रमाणे मार्जिन देण्यात येईल.
प्रस्तावित वाढीव दराने मार्जिन ही अन्नधान्य व साखर विक्री ऑनलाईन व्यवहाराद्वारे करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांनाच लागू करण्यात येईल . याची सर्व रास्त भाव दुकानदारांनी याची नोंद घ्यावी.असे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज