उद्योगमित्र समितीची बैठक:आजारी उद्योगांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करावा- जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी
अलिबाग दि.18, (जिमाका) :- जिल्ह्यातील
आजारी उद्योगांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुनर्वसन कार्यक्रम मंजूर करण्यासाठी
आजारी उद्योगांच्या एकत्रित माहितीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राने सादर करावा,
असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्हा उद्योग
मित्र व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज जिल्हाधिकारी
डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेतखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा
उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, तसेच उद्योग मित्र समितीचे
सदस्य अनिल खालापूरकर, महादेव पाटील, अशोक पाटील, सतिष चव्हाण, महेश गोराडे नजिर फोफलूनकर
आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी
जिल्ह्यातील एमआयडीसीच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा
उद्योग केंद्र, एमआयडीसी आणि जिल्हा कौशल्य विकास केंद्र या तिनही विभागांनी एकत्रित प्रयत्न
करुन जिल्ह्यातील 18 ते 35 वयोगटातील स्थानिक तरुणांना योग्य कौशल्य विकास प्रशिक्षण
देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सुचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी
यावेळी केली. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग यांचा सन 2017-18 या आर्थिक
वर्षातील विविध योजनांतर्गत झालेल्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. श्रीमती
देशमुख यांनी एमआयडीसीतील विविध समस्यांबाबत माहिती सादर केली. यावेळी शासनाच्या अग्निशमन
यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल आदी विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित
होते.
0000000
Comments
Post a Comment