रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग दि.19 (जिमाका)- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून पुढील 24 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) ते त्यापेक्षा अधिक (12 से.मी. ते 24 से.मी.) होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे दरडग्रस्त, नदी किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना व मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे.
तसेच अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, दरड कोसळणे इत्यादील आपत्कालीन परिस्थितीस समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322/9763646326 या क्रमांकावर द्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
00000
Comments
Post a Comment