जिल्हा न्यायालयात मध्यस्थी कार्यक्रम जागृती कार्यक्रम




अलिबाग,(जिमाका)  दि.18:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने  शनिवार दि.16 रोजी वकील संघटना कक्ष,अलिबाग यांचे न्यायकक्षामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग यांचे मार्गदर्शनानुसार मध्यस्थी जागृती कार्यक्रम पार पडले.   
          या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड अलिबाग मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश व.स्तर,अलिबाग, एल.डी.हुली, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील संघटनेचे अतुल मयेकर  तसेच अन्य् न्यायिक अधिकारी, वकील  वर्ग,तसेच पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.

 यावेळी दुसरे सह.दिवाणी व. स्तर न्यायाधीश श्रीमती हेमा पाटील, ज्येष्ठ् विधिज्ञ  श्रीमती मानसी म्हात्रे,यांनी मध्यस्थ संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले.   त्यानंतर प्रमुख जिल्हा  न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मध्यस्थ प्रक्रीया आणि लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त् प्रकरणे तडजोडीने निकाली काढणेसाठी वकील वर्ग व पक्षकार यांना आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन पल्लवी तुळपुळे यांनी केले. तसेच तिसरे दिवाणी न्यायाधीश,क.स्तर वृषाली पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत