लोकशाही दिनी तीन अर्ज दाखल



अलिबाग,जि. रायगड, दि.3 (जिमाका)-  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.  सोमवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने आज (मंगळवार,दि.3)  लोकशाही दिन आयोजित करण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, अपर पोलीस अधिक्षक संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदनवार तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी तीन जणांचे अर्ज सादर करण्यात आले. त्यात महसूल विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख  या कार्यालयांशी संबंधित प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अर्ज सादर झाले.  तसेच यावेळी  विभागनिहाय प्रलंबित अर्जांचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला.  सर्व अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज