महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे
हातकागद निर्मिती प्रशिक्षण
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड अलिबाग तर्फे, संचालक,हातकागद संस्था, पुणे येथे 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्यादृष्टीने ग्रामोद्योग उभारणी करीता हातकागद निर्मितीचे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  इयत्ता आठवी, एस.एस.सी, एच.एस.सी.पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या किंवा प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या व 18 ते 45 वर्षे वयोगटांतील  इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शैक्षणिक व अन्य दाखल्यांसह व्यवस्थापक, हातकागद संस्था,पुणे, किंवा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र,ठिकरुळ नाका, मु.पो.ता.अलिबाग, जि.रायगड यांच्याशी संपर्क साधावा,असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज