डिसेंबर महिन्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व क्रीडा वातावरण निर्मिती व्हावी यासाठी डिसेंबर महिन्यात दि.१२ ते  १८ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा सप्ताह उपक्रमात जास्ती जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
क्रीडा सप्ताहातील कार्यक्रमांचा तपशिल याप्रमाणे-
दि.12 डिसेंबर रोजी  जि.प. प्राथमिक शाळा नवगाव, ता.अलिबाग येथे स्थानिक खेळाडूंचे शहरात संचलन तर विद्यार्थ्यांचे समुहगान, राष्ट्रभक्तीपर गायन तसेच  क्रीडा क्षेत्रातील उच्च पदस्थ तसेच मान्यवर व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन.
दि.13 डिसेंबर रोजी  सुषमा पाटील विद्यालय कामोठे ता.पनवेल  येथे भारतीय पारंपारीक व्यायामप्रकार खेळाचे प्रदर्शन तसेच चित्रपट प्रदर्शन व लोकनृत्य सादरीकरण.
दि.14 डिसेंबर  रोजी जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे स्थनिक पातळीवर विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने तसेच विविध स्पर्धांचे आयोजन त्यामध्ये कराटे, बेल्टरेसलिंग, तायक्वांदो यांचा समावेश.
दि.15 डिसेंबर रोजी आरसीएफ स्कुल कुरुळ ता. अलिबाग येथे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, नामवंत खेळाडुंचे चर्चासत्र.
दि.16 डिसेंबर रोजी  स. म. वडके विद्यालय चोंढी ता.अलिबाग येथील  भारतीय कार्यक्रमाचे आयोजन.
दि.17 डिसेंबर रोजी जिराड मांडवा रोड धेाकवडे नं.1 ता.अलिबाग येथे रोडरेस, सायकल शर्यतींचे आयोजन.

दि. 18 डिसेंबर रोजी समारोप समारंभ जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे. तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सप्ताहातील विविध कार्यक्रमातील विजेत्यांना पारीतोषिक वितरण तसेच जिल्हयातील क्रीडा पुरस्कार विजेते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडु व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचा सत्कार . या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक