माथेरान सनियंत्रण समितीची बैठक 2 फेब्रुवारीला
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील अधिसूचनेन्वये
संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील
सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात
करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री. या कामांना सनियंत्रण समितीच्या
पूर्व मान्यतेची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील माथेरान ता.कर्जत येथे
संनियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या
समितीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी अर्ज जिल्हाधिकारी रायगड
यांचेकडे अलिबाग येथे सपूर्द करावेत. असे अर्ज सनियंत्रण समितीच्या बैठकीत विचारार्थ
घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या उपरोक्त नमूद कामासाठी सनियंत्रण समितीची मान्यता
घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव 10 प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य
सचिव सनियंत्रण समिती यांचेकडे सनियंत्रण समितीच्या बैठकीपूर्वी किमान 05 दिवस अगोदर
प्राप्त होणे आवश्यक आहेत. त्या दृष्टीने ज्यांचे असे प्रस्ताव असतील त्यांनी त्यांचे
प्रस्ताव सनियंत्रण समितीकडे तात्काळ सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी,रायगड यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment