आपले सरकार सेवा केंद्र: स्थापनेसाठी प्रस्ताव मागविले; 31 मार्च पर्यंत मुदत
अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.6:- शहरी व ग्रामीण भागात
लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्त जागी आपले सरकार सेवा केंद्र माहिती व तंत्रज्ञान
विभागाच्या दि.19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया
सुरु झाली आहे. त्या बाबत रिक्त जागांविषयीची माहिती www.raigad.nic.in या संकेत स्थळावर माहिती प्रसिद्ध
करण्यात आली आहे. तरी इच्छुक स्थानिक उमेदवाराने जिल्हाधिकारी कार्यालायत अर्ज
करावा. अर्ज सादर करण्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज
करताना सादर करावयाची कागदपत्रे- विनंती अर्ज, सेवा केंद्र स्थापनेच्या जागेचा
भाडे करार अथवा स्वत:चा असेल तर त्या बाबतचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, शैक्षणिक
किमान अर्हता 12 वी पास चे प्रमाणपत्र, संगणकीय ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र,
चारित्र्य पडताळणी अहवाल, आपण देत असलेल्या B2C सेवांचा मागील सहा महिन्यांचा
तपशील., तरी रायगड जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र सुरु करु इच्छिणाऱ्या
व्यक्तिंनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावेत, असे आवाहन सामान्य शाखेचे
तहसिलदार के. डी. नाडेकर यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment