मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी शुक्रवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-रायगड जिल्ह्यातील पथक,उपपथकामधील पुरुष,महिला मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी शुक्रवार दि.9 मार्च रोजी पोलीस कवायत मैदान, रायगड अलिबाग येथे सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा यावेळात घेण्यात येणार आहे, असे जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी कळविले आहे.
त्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे- शिक्षणी कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वय-20 ते 50 वर्षे, उंची महिलांकरीता 150 से.मी. व पुरुषांकरिता 162 से.मी. आणि छाती 76 सें.मी. फुगवून 81 सें.मी. तसेच उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागेल.पात्र उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशीलाच्या पुष्ट्यर्थ सर्व संबंधीत मुळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.उमेदवारास नोंदणीचेवेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल व दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधीत उमेदवराची राहील. तसेच उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.असे आवाहन संजयकुमार पाटील, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज