वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- राज्याचे गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन  विभागाचे राज्यमंत्री ना. डीपक केसरकर हे रविवार दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
रविवार दि. 11 रोजी पहाटे दोन वा. माणगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह माणगावकडे प्रयाण.  पहाटे सव्वा दोन वाजता माणगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. माणगाव येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. साडेदहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.  सकाळी 11 वा. क्रांतीदिनानिमित्त चवदार तळे व क्रांतीस्तंभ पाहणी.  दुपारी 12 वा. महाड क्रांतीदिना निमित्त पूर्व तयारीबाबत बैठक, दुपारी एक वाजता महाड क्रांतीदिनानिमित्त कायदा व सुरक्षा संदर्भात बैठक. (स्थळ:डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड). सोईनुसार महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण किंवा धरमतर जेट्टी ता. पेण कडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान