पनवेल येथील आगग्रस्तांची पालकमंत्र्यांनी केली विचारपूस



पनवेल येथील तक्का झोपडपट्टीत दि.21 रोजी मध्यरात्री आग लागून सुमारे चाळीस झोपड्या जळून खाक झाल्या. या आगग्रस्त नागरिकांची काल (दि.22) सकाळी राज्याचे बंदरे, वैद्यकिय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन विचारपूस केली. सकाळी पनवेल ना. चव्हाण यांनी महापौर डॉ.कविता चौतमल, आमदार प्रशांत ठाकूर,  उपमहापौर चारुशिला घरत व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली व पाहणी केली. स्थानिकांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक