जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक पिक कर्ज योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात  शेतीची कामे करण्यासाठी पेरणीपूर्व  अर्थसहाय्य देण्यासाठी पिककर्ज योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत दिले.
 जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक राजस्व सभागृहात पार पडली. यावेळी  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, नाबार्डचे सुधाकर राघवथन, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नंदनवार तसेच विविध बॅंकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी बॅंकांनी जिल्ह्यासाठी करावयाच्या विविध अर्थसहाय्य योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा कृति आराखडा दिला आहे. त्यानुसार 2022 पर्यंत कृषि क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य पुरवून शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे.  यावेळी बॅंकांच्या जमा- कर्ज तपशिल,  पिक कर्ज आढावा,  वार्षिक पत आराखड्यानुसार झालेली कामगिरी यांचा आराखडा घेण्यात आला. तसेच स्वयंसहाय्यता बचत गट, मुद्रा योजना, जिल्ह्यातील उदयोन्मुख उद्योजक आदींना करावयाच्या अर्थसहाय्य योजनांचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बॅंकांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज