राज्यस्तरीय विज्ञानप्रदर्शनात सुकेळीची हनान म्हसलई प्रथम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- चाळीसगाव, जि. जळगाव येथे  दि.7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या 43 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटातून जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूल, सुकेळी, ता. रोहा या शाळेतील हनान हसन म्हसलई, इयत्ता 7 वी.  या विद्यार्थीनीने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या प्रदर्शनामध्ये 'वॉटरपॉनिक्स' हा प्रकल्प तिने उत्कृष्टपणे सादर केला. जळगावचे खासदार ए.टी.पाटील, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते हनान हसन म्हसलई हिला रोख रक्कम रु. पाच हजार,ट्रॉफी,चॅम्पियन्स ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रायगड जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक डी. जी.हरकळ यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. हनान हसन म्हसलई हिच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील,शिक्षण सभापती नरेश पाटील,आदी मान्यवरांनी व जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थिनीचे अभिनंदन केले,असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज