मासिकपाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे
मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, यांनी आज केले.
जिल्हा
पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषदेतर्फे मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती
कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत
वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)
पी.एस.साळुंखे उपस्थित होते.
कार्यशाळेत
डॉ.प्रणाली पाटील यांनी मासिकपाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, येण्याची कारणे, गैरसमज
याबाबत तर महिलांचे आरोग्य व त्याबाबतच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत डॉ.रेखा म्हात्रे
यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व शासनाच्या अस्मिता योजने बाबत सविस्तर माहिती
दिली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले तर आभार नेहा जाधव
यांनी मानले.
या कार्यशाळेस
जिल्हा परिषदेतील विविध विभागातील महिला कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या
विद्यार्थींनी, जिल्हा पाणी व स्वच्छता मशिन कक्षाचे आदिती मगर, प्रणाली पाटील उपस्थित
होत्या.
00000
Comments
Post a Comment