सेवाविषयक बाबी ऑनलाईन; 248 जि.प. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- केडर मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या सेवा विषयक बाबी ऑनलाईन करण्याबाबत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचे जिल्हा परिषदेच्या 248 कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.19) प्रशिक्षण घेतले.
 यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.ही संगणक प्रणाली एनआयसी ने विकसित केली आहे. ग्राम विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या पुढाकारामुळे ही संगणक प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे,पदोन्नती,बदली रजा या सारख्या सेवा विषयक अनेक बाबी ऑनलाईन करण्यात येणार आहेत.
या ऑनलाईन संगणक प्रणालीबाबतचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण मंगळवार दि.  19  रोजी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय प्रभाकर पाटील सभागृहात आयोजित पार पडले. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त् मुख्य् कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्या हस्ते झाले. या प्रशिक्षणास रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व स्तरावरील एकूण 153 कार्यालयातील 248 कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते. या प्रकल्पाबाबत यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे  यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  या प्रकल्पाबाबत  मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रशिक्षण शिबीराचे संचालन संदेश म्हात्रे, प्रशिक्षक अमरदीप ठोंबरे यांनी केले.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज