योग दिन आयोजनाचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- केंद्र व राज्यशासनाने 21 जुन हा दिवसा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. राज्यशासनाने प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन गाव पातळीपर्यंत योग विद्येचा प्रसार होण्याच्यादृष्टीने खाजगी योग प्रसार करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून  संबंधित प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे,चर्चासत्र कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम,जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये महाविद्यालये विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एनएसएस नेहरु युवा केंद्र इ.युवा संघटनामार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 5 दिवसांच्या योगा उत्सवाचे आयोजन करणे असे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांबरोबरच सर्व शासकीय कार्यालय, सर्व ग्रामपंचायती,पंचायत समित्या या ठिकाणी गुरुवार दि.21 जुन रोजी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या योग शिष्टाचारानुसार सकाळ, सायंकाळ सत्रामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी किमान अर्धा ते एक तास योगासने करुन व समाजातील सर्व घटकांनी सदर कार्यक्रमासाठी सहकार्य करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
00 00

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक