राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत वाढ



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25-राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेबाबत केंद्रशासनाने सन 2017 -18 या वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वार्षिक रु. सहा हजार रुपयांऐवजी रु. 12 हजार इतकी वाढ केली आहे. केंद्र शासनाने बाराव्या नियोजन आयोगानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेबाबत सन 2017-18 या वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये रु.पाचशे वरुन दरमहा रु.एक हजार  तर तिमाहीसाठी रु.पंधराशे च्या दुप्पट म्हणजेच तीन हजार तर सहा हजारावरु रु.बारा हजार या प्रमाणे वाढ केली आहे.
ही वाढ सन 2017-18 मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील होणाऱ्या परीक्षेकरीता लागू राहील. 1.)परिक्षा दिनांक 20 नोव्हेंबर 2016 (सन 2017-18 इयत्ता नववी नवीन), 2.)परिक्षा दिनांक 7 जानेवारी  2016 (सन 2017-18 इयत्ता दहावी नुतनीकरण), 3.)परिक्षा दिनांक 10 जानेवारी  2015 (सन 2017-18 इयत्ता अकरावी  नुतनीकरण), 4.)परिक्षा दिनांक 17 नोव्हेंबर 2013 (सन 2017-18 इयत्ता बारावी नुतनीकरण).तरी पात्र विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज