अल्पसंख्याक शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; प्रस्ताव मागविले



                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-  राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते. रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्याकडे दि.14 ऑगस्ट  पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती सुनिल जाधव यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत