एकात्मिक विकास व व्यवस्थापन योजना मच्छिमारांना लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16-  भुजलाशयीन, सागरी,निमखारेपाणी क्षेत्रातील उपलब्ध साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करुन शाश्वत पध्दतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणीय समतोल राखून मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी निलक्रांती धोरणाअंतर्गत मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.   या योजनेंतर्गत मच्छिमारांना सर्वसाधारण गटात 40 टक्के अनुदान व अनुसूचित जाती, जमाती, महिला व महिलांच्या संस्था यांना 60 टक्के अनुदानाच्या विविध योजनांचा लाभ आहे.  निलक्रांती धोरणाअंतर्गत पूर्वी कार्यरत नऊ योजना सुधारित बदलासह व नविन अशा 21 योजनांची अंमलबजावणी करावयाची आहे.  यामध्ये इन्सुलेटेड ट्रक,ऑटो रिक्षासह शितपेटी, मोटार सायकलसह शितपेटी, फिरते मत्स्यविक्री केंद्र, किरकोळ मासळी विक्री केंद्र, मासळी वाहतुकीसाठी वाहन, बर्फ कारखाना, नविन तळी बांधकाम, पारंपारिक मच्छिमारांना लाकडी ऐवजी फायबर नौका खरेदीस अर्थसहाय्य इत्यादी योजनांचा समावेश आहे.  या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मच्छिमारांनी (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, महिलांच्या सहकारी संस्था व गट) यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, तिसरा मजला, सिध्दी अपार्टमेंट शेतकरी भवनच्या बाजूला अलिबाग-पेण रोड (दू.क्र.02141-224221) तसेच अधिनस्त कार्यालय परवाना अधिकारी मुरुड व श्रीवर्धन यांचे कार्यालय मो.7030230290, परवाना अधिकारी उरण कार्यालय मो.9833911905 यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे अभयसिंह शिंदे इनामदार सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज