माजी सैनिक पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अर्ज ऑनलाइन पध्दतीने www.ksb.gov.in या संकेत स्थळावर भरावयाचे आहेत.  फार्म भरताना सर्व मुळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावित  (झेरॉक्स वरून स्कॅन करू नये). फॉर्म्स भरण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2018  आहे.  त्यानंतर अपलोड केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी.अधिक माहीतीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचे दुरध्वनी क्र. 02141-222208 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेटावे. तरी जिल्ह्यातील 60 %  पेक्षा  जास्त गुण मिळविलेल्या  माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत