आंतर राष्ट्रीय युवा दिन व सप्ताह निमित्त एच.आय.व्ही.एड्स मार्गदर्शन शिबीर







             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग यांच्यामार्फत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय वेश्वी अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन व सप्ताह निमित्त  एच आय व्ही एड्स  विषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
             यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी  एच आय व्ही एड्स  बाधित व्यक्तींशी भेदभाव करणार नाही याबाबत शपथ देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या संजीवनी राजेंद्र नाईक या होत्या.   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, संजय माने  यांनी विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रोग्रॅम ऑफिसर रविंद्र यशवंत पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी  प्रोग्रॅम ऑफिसर श्वेता गुरव  पी एन पी  कॉलेज वेश्वी, जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक            श्री.नवनाथ लबडे, एसटीआय समुपदेशक सुरेश वाळंज मोबाइल व्हॅन  क्लिनर रुपेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले .
              या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे प्रभावित होऊन 61 युवक युवतींनी स्वेच्छेने  एच आय व्ही समुपदेशन व तपासणी करून घेतली.
                                                            00000           

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज